Monday 19 March 2018

कोयना पर्यटन विकासाचा आराखडा तात्काळ मागवून कार्यवाही करावी. तालिका अध्यक्ष शंभूराज देसाई यांच्या पर्यटनमंत्री ना.रावल यांना सुचना.




      प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील पर्यटन विकासाकरीता व येथील पर्यटनाच्या दृष्टीने मुलभूत सुविधांच्या विकासकामांकरिता कोयना पर्यटन आराखडा हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातंर्गत तयार करण्यात यावा अशी मागणी राज्याचे पर्यटन विकासमंत्री म्हणून आपणांकडे सातत्याने होत आहे.सदरचा कोयना पर्यटन विकासाचा आराखडा तात्काळ मागवून घेवून यावर तातडीने कार्यवाही करावी अशा सुचना तालिका अध्यक्ष शंभूराज देसाई यांनी राज्याचे पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल यांना दिल्या.
       अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र पर्यटन विकासाच्या संदर्भात चर्चा सुरु होती यावेळी विधानसभा तालिका अध्यक्ष शंभूराज देसाई यांनी या चर्चेदरम्यान कोयना पर्यटन विकास आराखडा तयार करणेबाबत वारंवार राज्याचे पर्यटन मंत्री म्हणून आपणांकडे मागणी करण्यात येत आहे यावर आपण काय कार्यवाही केली? असा सवाल करुन सदरचा कोयना पर्यटन आराखडा तात्काळ मागवून घ्यावा अशा सुचना तालिका अध्यक्ष शंभूराज देसाई यांनी पर्यटन मंत्रयांना केल्या.
याप्रसंगी सुचना करताना तालिका अध्यक्ष पदावरुन शंभूराज देसाई यांनी पाटण तालुका निर्सगरम्य आणि सौदर्यांने नटलेला तालुका असुन तालुक्यातील कोयना भागात अनेक ठिकाणी पर्यटन विकासास वाव आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखला जाणारा कोयना जलविद्यूत प्रकल्प याच विभागात आहे.या विभागातील अनेक ठिकाणे ही पर्यटकांना नेहमी आकर्षित करतात त्यामुळे हा विभाग कोयना पर्यटन म्हणून विकसीत करणेकरीता राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने पुढाकार घेणे गरजेचे आहे अशी आग्रही मागणी राज्याच्या पर्यटन विभागाकडे गत तीन वर्षापासून सातत्याने होत आहे यासंदर्भात पर्यटन विभागाने कोणती कार्यवाही केली? असा सवाल राज्याचे पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांना केला व तात्काळ शासनाच्या पर्यटन विभागामार्फत कोयना पर्यटन विकासाचा आराखडा मागवून घेवून त्यावर कार्यवाही करावी अशी सुचना केली यावर सदरचा कोयना पर्यटन आराखडा हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातंर्गत तात्काळ मागविला जावून यावर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांनी यावेळी विधानसभा सभागृहात बोलताना तालिका अध्यक्ष शंभूराज देसाई यांना दिले.

2 comments: