Sunday 11 March 2018

जिल्हा कृषी महोत्सवाचा शेतक-यांनी लाभ घ्यावा :- आमदार शंभूराज देसाई. दौलतनगर(मरळी)येथील जिल्हा कृषी महोत्सवास प्रारंभ- महोत्सवात 200 विविध स्टॉल


लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या १०८ व्या जयंती च्या अनुषंगाने दौलतनगर (मरळी) ता पाटण येथे  दिनांक १० मार्च ते १४ मार्च या कालावधीत राज्य शासनाच्या वतीने पाच दिवस चालणाऱ्या  सातारा जिल्हा कृषी महोत्सव २०१८ चे उदघाटन प्रगतशील शेतकरी यांच्या हस्ते करण्यात आले असून या जिल्हा कृषी महोत्सवाचा सातारा जिल्हयातील शेतक-यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार शंभूराज देसाई यांनी केले आहे.
आमदार शंभूराज देसाई यांनी सर्व कृषी महोत्सवाची पहाणी केली यावेळी त्यांचेसोबत जिल्हा कृषी अधिकारी कृषी अधिक्षक सुनील बोरकर,सातारा जिल्हा आत्मा प्रकल्प संचालक अशोक देसाई,पाटण चे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,आत्मा चे प्रकल्प उपसंचालक विजयकुमार राऊत,सातारा जिल्हा कृषी उपसंचालक गुरुदत्त काळे,सातारा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चांगदेव बागल,कराड चे उपविभागीय कृषी अधिकारी प्रभाकर पाटील, फलटण चे उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, वाईचे उपविभागीय कृषी अधिकारी विजय माईनकर,पाटण चे कृषी अधिकारी प्रवीण आवटे, कराडचे कृषी अधिकारी दत्तात्रय खरात,तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी,मंडल कृषी अधिकारी,कृषी पर्यवेक्षक,कृषी सहाययक,जिल्हा परिषद पंचायत समितींचे कृषी अधिकारी,आत्म्याचे अधिकारी,शेतकरी,कृषी मित्र,प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
        या कृषी महोत्सवामध्ये  विविध शासकीय विभागाचे सुमारे २०० स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. या कृषी महोत्सवात उत्पादक शेतकरी चे ग्राहक थेट विक्री व्यवस्था,धान्य महोत्सव,शेतमाल मूल्यवर्धन,सेंद्रिय शेयमल,आकर्षक पॅकेजींग,कृषी यांत्रिकीकरण,विविध कृषी विषयक व विविध शासकीय योजना,कृषी निविष्ठा,शेतकऱ्यांची फळे,फुले,भाजीपाला व धान्ये यांचे उत्कृष्ठ नमुने,पाणलोट चे जलयुक्त शिवार मॉडेल,शेती पद्धतीचे विकसित मॉडेल तसेच वनविभाग,शासनाच्या कर्जमुक्ती योजना आणि बँकांची माहिती अशा सुमारे 200 विविध आणि आकर्षक स्टॊल चा समावेश आहे.उदघाटन च्या पहिल्याच दिवशी या महोत्सवात मोठ्या प्रमाणात  शेतकरी आणि ग्राहक यांची गर्दी झाली असून पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही कृषीपर्वणी ठरली असून या जिल्हा कृषी महोत्सवाचा सातारा जिल्हयातील शेतक-यांनी लाभ घ्यावा असे कृषी महोत्सवाचे आयोजक आमदार शंभूराज देसाई यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment