Saturday 24 March 2018

१९८३ ची पुनरावृत्ती करायला पाटणकरांनी जनतेला गेल्या साडेतीन वर्षात दिलयच काय? यंदाच्या वर्षी सातारा जिल्हयात सर्वात जास्त निधी पाटण मतदारसंघात आणला. आमदार शंभूराज देसाई.


        गेल्या साडेतीन वर्षापुर्वी तालुक्यातील जनतेला मते मागून गेल्यानंतर आपले विरोधक माजी आमदार पाटणकर आणि त्यांच्या सुपुत्रांनी मतदारसंघातील जनतेकडे पाहिले सुध्दा नाही. गेल्या साडेतीन वर्षात एक रुपयांचा निधी ते मतदारसंघातील जनतेच्या मुलभूत गरजा भागविण्याकरीता देवू शकले नाहीत आणि याच मंडळींना आता २०१९ च्या विधानसभा निवडणूकीची दिवास्वप्ने पडू लागली आहेत. १९८३ ची पुनरावृत्ती येणा-या २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत करा असे आवाहन देणारे माजी आमदार पाटणकर यांनी गत साडेतीन वर्षात मतदारसंघातील जनतेला दिलयच काय? याचे उत्तर प्रथमत: दयावे. २०१४ ला ज्या विश्वासाने मतदारसंघातील जनतेने मला तालुक्याचा आमदार म्हणून विधानसभेत जाण्याची संधी दिली त्या संधीचे सोने मी गत साडेतीन वर्षात करुन दाखविले.यंदाच्या वर्षी सातारा जिल्हयात सर्वात जास्त निधी शासनाच्या तिजोरीतून पाटण मतदारसंघात मी आणला आहे माजी आमदारांना तो मागील पाच वर्षात आणता आला नाही असा टोला आमदार शंभूराज देसाईंनी लगाविला आहे.
       सलतेवाडी वाझोली ता.पाटण येथे आमदार शंभूराज देसाई यांचे स्थानिक विकास निधीमधून दिलेल्या सभामंडपाचे भूमिपुजन समारंभप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ.दिलीपराव चव्हाण, पंचायत समिती सदस्या सौ.सिमा मोरे, माजी सदस्य रघूनाथ माटेकर, कारखान्याचे माजी संचालक बबनराव पाटील,वाझोली सरपंच राजेश चव्हाण,उपसरपंच अशोक मोरे,रामचंद्र सलते,सदाशिव शेलार,दिलीप शेलार,शंकर शेलार,दत्तात्रय सलते,विमल सलते यांच्यासह सलतेवाडी येथील प्रमुख कार्यकर्ते, महिला यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
         याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, सन २०१४ च्या निवडणूकीत ज्या विश्वासाने १८८२४ म्हणजेच १९ हजार मतांनी मतदारसंघातील मतदारांनी मला विजयी करीत विधानसभेत जाण्याची संधी दिली त्या संधीचे सोने करण्याचा माझा गत साडेतीन वर्षात प्रयत्न राहिला आहे.मतदारांच्या डोळयाला दिसेल असे काम या साडेतीन वर्षात मी करण्याचा प्रयत्न केला. ज्या गांवाना बारमाही जोडणारे रस्ते नव्हते त्या रस्त्यांच्या कामांना प्राधान्याने निधी मंजुर करुन आणला आज गावा-गावात गांव जोडणारे रस्ते काही ठिकाणी पुर्ण झाले आहेत तर काही रस्त्यांची कामे मोठया प्रमाणात सुरु आहेत. पाटण मतदारसंघात डोंगरी भागातील जी गावे अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचीत होती अशा मतदारसंघातील एकाच वेळी ५६ गावांना शासनाच्या पाणी पुरवठा विभागाकडून पिण्याच्या पाण्याच्या योजना मंजुर करुन आणल्या आहेत. वाझोली गावाचाच विचार केला या गांवामध्येच ७५ लाख म्हणजे पाऊण कोटी रुपयांची कामे या तीन वर्षात दिली. डाकेवाडी ते सलतेवाडी अनेक वर्षापासून प्रलंबीत असणारा रस्ता आपण मार्गी लावला या रस्त्याचे काम आता पुर्णत्वाकडे आले आहे. अजिबातच रस्ता नव्हता अशा ठिकाणी सुरवातीस खडीकरण पुर्ण करुन घेतले ज्यामुळे या दोन्ही वाडीतील ग्रामस्थांची दळणवळणाची सोय झाली अशाच प्रकारे मतदारसंघातील प्रत्येक विभागात विविध विकासकांमे सध्या सुरु आहेत तर अनेक ठिकाणी पुर्ण झाली आहेत. मतदारांचा केवळ मतापुरता वापर करुन घेणे ही शिकवण आम्हाला लोकनेते साहेबांनी कधीच दिली नाही. मतदारांच्या गरजा पुर्ण करणे लोकप्रतिनिधींचे काम असते ते काम प्रामाणिकपणे मी करीत आहे.विकास काय असतो हे ख-या अर्थाने गत साडेतीन वर्षात मतदारसंघातील मतदारांच्या लक्षात येवू लागले आहे. मतदारसंघातील जनतेला हातात काही देण्यासारखे नसताना मला निवडणूकीला विजयी करा असे म्हणणा-या विरोधकांनी गत साडेतीन वर्षात मतदारसंघातील जनतेला काही एक विकासकाम दिले नाही. तरीही त्यांना २०१९ च्या विधानसभा निवडणूकीची दिवास्व्प्ने पडू लागली आहेत त्यामुळे आपणही सावधता बाळगणे गरजेचे आहे आमदार म्हणून मी जनतेच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. पुढील दीड वर्षात मतदारसंघात प्रलंबीत राहिलेली विकासकांमे कशी मार्गी लावायची याचा मी आराखडा तयार केला आहे. आपण विधानसभेला मतदारांना मते मागताना विकासाच्या जोरावर मते मागायची आहेत. आपण गत साडेतीन वर्षात केलेला आणि येणा-या दीड वर्षात करावयाचा विकास हेच आपले राजकीय भांडवल असणार आहे त्यामुळे मतदारसंघातील जनतेने ज्यांच्या हातात देण्यासारखे काही नाही त्यांच्या भूलथांपाना बळी न पडता विकास करणा-या लोकप्रतिनिधीच्या मागे आपली ताकत उभी करावी असे आवाहन त्यांनी शेवठी बोलताना केले. प्रास्ताविक आनंदा मोरे यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले.               



No comments:

Post a Comment