पाटण तालुक्यातील कोयना जलविद्युत
प्रकल्पांतर्गत पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधा पुरविणेकरीता राज्य शासनाच्या
महसूल विभागाकडे सादर केलेल्या २४ विविध विकासकामांना ०१ कोटी २६ लाख ९९ हजार ८४२ रुपयांच्या
अंदाजपत्रकास शासनाचे महसूल व वन विभागाच्या दि. ०१ मार्च २०१८
रोजीचे शासन निर्णयानुसार मंजूरी दिली असल्याची माहिती पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज
देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
आमदार शंभूराज देसाई यांनी दिलेल्या
पत्रकामध्ये म्हंटले आहे की, कोयना जलविद्युत प्रकल्पांतर्गत
पुनर्वसित झालेल्या गावठाणांमधील नागरी सुविधांची विविध विकासकामे मार्गी लावणेकरीता
राज्य शासनाचे महसूल मंत्री मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांचेकडे एकूण २४ विविध विकासकामांना निधी उपलब्ध होणेकरीता
प्रस्ताव सादर करुन आवश्यक त्या निधीची मागणी केली होती. त्यानुसार
२४ विविध विकासकामांना ०१ कोटी २६ लाख ९९ हजार ८४२ रुपयांचा निधी मंजुर केला असलेबाबत
शासनाचे महसूल व वन विभागाने दि.०१ मार्च २०१८ रोजी शासन निर्णय
पारित केला आहे.यामध्ये खालील कामांचा समावेश असल्याचे आमदार
शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे. ढोकावळे रिसवड पोहोच रस्ता
डांबरीकरण करणे व मोरी बांधकाम करणे ५२.६७ लक्ष, किसरुळे बोपोली (दवंडेवस्ती,लाडवस्ती,भराडेवस्ती,मानेवस्ती) पोहोच रस्त्यावर
मोरी बांधकाम करणेसाठी ४.९७ लक्ष, बाजे
मारुल पोहोच रस्ता डांबरीकरण करणेसाठी १७.३५ लक्ष, मिरगाव बोपोली स्मशानभूमी शेड बांधणेसाठी २.२२ लक्ष,
ढोकावळे रिसवड स्मशानभूमी शेड व पोहोच रस्ता करणे ३.२८ लक्ष, नहिंबे मेंढेघर येथे स्मशानभूमी शेड बांधणेसाठी
२.२१ लक्ष, गोजेगाव वांझोळे येथे स्मशानभूमी
शेड बांधणेसाठी २.१९ लक्ष, चिरंबे मणेरी
येथे स्मशानभूमी शेड बांधणेसाठी २.२० लक्ष, आंबेघर रासाटी येथे स्मशानभूमी शेड बांधणेसाठी २.१९ लक्ष,
किसरुळे मेंढेघर येथे स्मशानभूमी शेड बांधणेसाठी २.२१ लक्ष, किसरुळे ढाणकल येथे स्मशानभूमी शेड बांधणेसाठी
२.२४ लक्ष या ठिकाणी स्मशानभूमी शेड बांधणे, नहिंबे मेंढेघर येथे आर.सी.सी.
गटर बांधणेसाठी २.८४ लक्ष, किसरुळे बोपोली (लाडवस्ती) येथे
आर.सी.सी.गटर बांधणेसाठी
४.८६ लक्ष, आंबेघर रासाटी येथे बस थांबा
२.२९ लक्ष, म्हाळूंगे शिवंदेश्वर येथे बस
थांबा २.३५ लक्ष, मिरगाव चाफेर येथे बस
थांबा २.२७ लक्ष, नहिंबे तळीये येथे बस
थांबा २.३१ लक्ष, नवजा ढाणकल येथे बस थांबा
२.३६ लक्ष, किसरुळे मेंढेघर येथे बस थांबा
२.३४ लक्ष, हुंबरळी देशमुखवाडी येथे बस
थांबा २.३१ लक्ष, झाडोली नेचल येथे बस थांबा
२.३५ लक्ष, तळोशी कोंढावळे येथे बस थांबा
२.३१ लक्ष व किसरुळे ढाणकल येथे बस थांबा २.३९ लक्ष असे एकूण २४ गावांतील विविध कोयना प्रकल्पांतर्गत पुनर्वसित गावठाणांतील
नागरी सुविधांच्या कामांच्या कामांना ०१ कोटी २६ लक्ष ९९ हजार ८४२ रुपये मंजूर झाले
असून लवकर या कामांची निविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असल्याचेही
त्यांनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे .
चौकट:- कोयना धरणग्रस्तांच्या
प्रलंबीत प्रश्नांसाठी अधिवेशनात
लक्षवेदी दाखल.
गत तीन वर्षात कोयना प्रकल्पांतर्गत
पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधांच्या कामांना अशाचप्रकारे निधी उपलब्ध करुन आणला
असून कोयना धरणग्रस्तांचे या प्रकल्पातंर्गत जमिनींचे तसेच अनेक प्रश्न आजही मोठया
प्रमाणात शासनस्तरावर प्रलंबीत आहेत या प्रश्नांकरीता सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात
लक्षवेदी सुचना दाखल केली असून सदर लक्षवेदी सुचना चर्चेला आल्यानंतर या प्रश्नांसंदर्भात
गांभीर्याने शासनाचे लक्ष वेधून शासनाकडून सकारात्मक निर्णय करुन घेणेस मी कटीबध्द
असल्याचे आमदार देसाईंनी म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment