Thursday 8 March 2018

पाटण विधानसभा मतदार संघातील 53 नळ पाणी पुरवठा योजनांचा रविवारी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीससाहेब यांचे शुभहस्ते होणार ई भूमिपूजन समारंभ.

        पाटण विधानसभा मतदार संघाचे उत्कृष्ट ससंदपटु आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचे विशेष प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदार संघातील सन 2017-18 च्या आराखडयामधील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती व जिल्हा नियोजन समितीच्या विशेष घटक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या एकूण 53 नळ पाणी पुरवठा योजनांचे राज्यांचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीससाहेब यांचे शुभहस्ते व पाणी पुरवठा मंत्री ना. बबनराव लोणीकरसाहेब यांचे व राज्यातील प्रमुख्‍ मान्यवर मंत्री महोदय यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि. 11 मार्च, 2018 रोजी दौलतनगर, ता. पाटण या ठिकाणी प्रथमच ई भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे.
       राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत मंजूर नळ पाणी पुरवठा योजना-  सुर्याचीवाडी (नाणेगाव), मस्करवाडी (काळगाव), धनगरवाडा (काळगाव), शितपवाडी, बाचोली, डावरी, म्हारवंड (निवकणे), आबदारवाडी, आवर्डे, दुसाळे, सोनवडे, बांबवडे, आंब्रुळे, नावडी, चोपदारवाडी, कदमवाडी (नाटोशी), जिंती, बांधवाट, पाबळवाडी, तळीये पश्चिम (मणेरी), गव्हाणवाडी, पेठशिवापूर, गारवडे, नाटोशी, घोट, आंबेवाडी घोट, मरळी, व सुपने मंडलातील आरेवाडी, बेलदरे व पश्चिम सुपने. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून मंजूर मौजे नाडे, कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीमधून मंजूर ढोकावळे गोकूळ (नाव), डिगेवाडी व काळेवाडी, दुधडेवाडी (मरळी), सातर, देशमुखवाडी, जुने गावठाण विहे, जंगमवाडी धजगाव, हारुगडेवाडी (नाडोली), तोंडोशी, कोळेवाडी (डेरवण), म्हाळूंगेवस्ती शिवंदेश्वर तसेच जिल्हा नियोजन समितीचे विशेष घटक योजनेतून मंजूर ऊरुल बौध्दवस्ती, कुसरुंड बौध्दवस्ती, डावरी बौध्दवस्ती, सळवे मातंगवस्ती, मालोशी बौध्दवस्ती, चोपदारवाडी बौध्दवस्ती, आंबेघर तर्फ मरळी बौध्दवस्ती, आटोली बौध्दवस्ती, पाळशी बौध्दवस्ती, काळगाव बौध्दवस्ती, नाडोली मातंगवस्ती अशा एकूण 53 नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश असून या नळ पाणी पुरवठा योजनांचे ई भूमिपूजन समारंभ होणार आहे.

No comments:

Post a Comment