Tuesday 6 March 2018



मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे यशराज देसाईंनी केले स्वागत
यशराज देसाईंचे वैज्ञानिक संशोधनानिमित्त मुख्यमंत्री यांचेकडून अभिनंदन व कौतुक.


राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे सातारा जिल्हयाच्या दौ-यावर आलेनंतर पाटणच्या देसाई घराण्यातील यशराज शंभूराज देसाई यांनी त्यांची सातारा याठिकाणी सदिच्छा भेट घेवून मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी वडील आमदार शंभूराज देसाई हे ही सोबत होते.यशराज देसाईंनी बांधकामाशी संबधित अभियांत्रिकी क्षेत्रात केलेल्या वैज्ञानिक संशोधनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली असल्याची बाब मुख्यमंत्री यांचे निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी यशराज देसाईंचे तोंडभरुन कौतुक आणि अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दि.२४ फेब्रुवारी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सातारा जिल्हयाच्या दौ-यावर आले होते यावेळी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचेबरोबर चिरंजीव यशराज शंभूराज देसाई यांनी सदिच्छा भेट घेतली व यशराज देसाई यांनी मुख्यमंत्री यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले यावेळी यशराज देसाईंनी केलेल्या वैज्ञानिक संशोधनासंदर्भात मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी यशराज देसाईंचे तोंडभरुन कौतुक व अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा बद्दल आमदार शंभूराज देसाई व यशराज देसाईंनी मुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment