पाटण तालुक्यातील दौलतनगर (मरळी), ता.पाटण येथे शनिवार दि.१० ते
बुधवार दि.१४ मार्च, २०१८ या कालावधीत सातारा जिल्हयाचा जिल्हा कृषी महोत्सव पाटण
विधानसभा मतदारसंघाचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे विनंतीवरुन राज्य शासनामार्फत आयोजीत
करण्यात आला असून या जिल्हा कृषी महोत्सवाचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार असून या समारंभास सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, उद्योग मंत्री ना. सुभाष
देसाई, पाणी पुरवठा मंत्री ना. बबनराव लोणीकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. एकनाथ
शिंदे, जलसंधारण मंत्री ना. राम शिंदे, पर्यटन मंत्री ना. जयकुमार रावल,
कामगारमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर,पशुसंवर्धन मंत्री ना.महोदव जानकर,
सातारा जिल्हयाचे पालकमंत्री तथा जलसंपदा राज्यमंत्री ना. विजय शिवतारे,
सहपालकमंत्री तथा कृषी राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत, वित्त व नियोजन राज्यमंत्री
ना. दिपक केसरकर, सहकार राज्यमत्री ना. गुलाबराव पाटील व सातारा लोकसभा
मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज हे प्रमुख मान्यवर
उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार शंभूराज
देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, राज्य
शासनामार्फत आयोजीत करण्यात येणारा जिल्हा कृषी महोत्सव हा यंदाच्या वर्षी दौलतनगर
(मरळी), ता.पाटण याठिकाणी आयोजीत करावा अशी विंनती मी शासनाकडे केली होती
त्यानुसार शनिवार दि.१० ते बुधवार दि.१४ मार्च, २०१८ या कालावधीत या जिल्हा कृषी
महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे १०८ व्या
जयंतीनिमित्ताने हा जिल्हा कृषी महोत्सव पाटण तालुक्यात आयोजीत करण्यात आला असून जिल्हा
कृषी महोत्सवात कृषी प्रदर्शन, कृषी परिसंवाद, खरेदीदार विक्रेता संमेलन, सेंद्रीय
धान्य महोत्सव होणार असून शेतक-यांनी त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही
त्यानिमित्ताने करण्यात आले आहे. कृषी विषय तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचवणे,
शेतकरी शास्त्रज्ञ व संशोधन, विस्तार, शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण, समुह गट
संघटीत करुन स्थापित शेतकरी उत्पादक कंपनी क्षमता बांधणी करणे, शेतमालाला चांगला
भाव मिळावा, ग्राहकांनाही उच्च दर्जाचा माल मिळावा याकरीता शेतकरी ते ग्राहक थेट
विक्री शृंखला विकसित करणे, शेतक-यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता,
खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख, कृषी उत्पादनास व विपनास चालना देणे
हा जिल्हा कृषी महोत्सव योजनेचा उद्देश आहे. कृषी प्रदर्शनात शासकीय दालन, विविध
कंपन्यांचे स्टॉल, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स,प्रात्यक्षिके यांचा समोवश असावा.
यामध्ये कृषी तंत्रज्ञान, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, संबंधित कृषी
महामंडळे तसेच खासगी कंपन्या, उद्योजक, बचतगट, शेतकरी, उत्पादक कंपन्या यांचा
समावेश राहणार आहे. परिसंवाद, चर्चासत्र यामध्ये प्रगतशील व यशस्वी शेतक-यांची
व्याख्याने आयोजित करण्यात आली आहे. या महोत्सवात शेतकरी सन्मान समारंभ,
जिल्हयातील कृषी व संलग्न क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेले तसेच पीक स्पर्धा
विजेत्या शेतक-यांना गौरविण्यात येणार या जिल्हा कृषी महोत्सवाचे उदघाटन राज्याचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते व वरील मान्यवरांच्या प्रमुख
उपस्थितीत होणार असल्याचे आमदार शंभूराज देसाई यांचेकडून पत्रकात सांगण्यात आले
आहे.
No comments:
Post a Comment