Tuesday 13 March 2018

पाटण विधानसभा मतदारसंघातील रस्ते, पुल व धरणांच्या कामाना राज्याच्या अर्थसंकल्पातून २५४ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी मंजुर. आमदार शंभूराज देसाई.


नुकत्याच झालेल्या सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झालेनंतर पाटण विधानसभा मतदारसंघातील रस्त्याच्या, पुलांच्या तसेच धरणांच्या कामांना एकूण २५४ कोटी ३८ लाख ९१ हजार रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजुर केला असून यामध्ये नवीन रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी २२ कोटी ३ लाख व मागील वर्षीच्या रस्त्याच्या व पुलांच्या कामांसाठी १४ कोटी ८५ लाख ६१ हजार अशी भरीव तरतूद करुन एकूण रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी ३६ कोटी ८९ लाख रुपये व तारळी, वांग मराठवाडी, मोरणा गुरेघर व निवकणे धरणांच्या कामांना २१७ कोटी ५० लाख रुपये असे एकूण २५४ कोटी ३८ लाख ९१ हजार रुपयांचा निधी शासनाने मंजुर केला असल्याची माहिती पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकात आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की, राज्याच्या अर्थस्ंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील रस्ते, पुल व धरणांच्या कामांना भरीव स्वरुपाचा निधी मिळावा याकरीता शासनाकडे मागणी केली होती नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील रस्ते, पुल व धरणांच्या कामांना एकूण २५४ कोटी ३८ लाख ९१ हजार रुपयांचा निधी शासनाने मंजुर केला आहे यामध्ये चरेगाव चाफळ दाढोली कुसरुंड नाटोशी रस्ता प्रजिमा ५३ किमी २५/० ते २६/५००,३२/००० ते ३३/००० सुधारणा करणे १ कोटी,ढेबेवाडी सणबूर महिंद नाटोशी रस्ता प्रजिमा ५५ किमी ४७/० ते ५१/० ची सुधारणा करणे १ कोटी,नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे रस्ता किमी १८/०० ते ४४/०० रामा १४८ किमी १८/५०० ते ३८/५०० भाग मेंढेघर ते मान्याचीवाडी मधील लांबीची सुधारणा करणे ६ कोटी,चरेगाव चाफळ दाढोली कुसरुंड नाटोशी प्रजिमा ५३ मध्ये मोरणा नदीवर मोठया पुलाचे बांधकाम करणे ८ कोटी ५३ लाख ३० हजार,नाडे सांगवड मंद्रुळकोळे ढेबेवाडी रस्ता प्रजिमा ५८ किमी ०/०० ते ५/०० भाग नाडे नवारस्ता ते मरळी मधील लांबीची सुधारणा करणे ७ कोटी ५० लाख, सातारा जिल्हयातील प्रजिमा ५५ ते काढणे शिद्रुकवाडी रस्त्यावर ग्रामा ३२० वांग नदीवर काढणे येथे मोठया पुलाचे बांधकाम करणे १ कोटी ७४ लाख ५४ हजार नाडे सांगवड ढेबेवाडी रस्ता किमी ९/५०० ते १७/००० प्रजिमा ५८ किमी १४/०० ते १७/०० भाग जुळेवाडी ते सुतारवाडी मधील लांबीची सुधारणा करणे.८ लाख ३० हजार, चरेगाव चाफळ दाढोली रस्ता किमी ०/०० ते १५/३०० प्रजिमा ५३ किमी भाग डेरवण ते दाढोली मधील लांबीची सुधारणा करणे ११ लाख ८६ हजार,पवारवाडी ते काळगाव मुठ्ठलवाडी ते तालुकाहद्द मधील लांबीची सुधारणा ०९ लाख ६१ हजार,पाटण मणदुरे जवळ तारळे पाल रस्ता तारळे ते राहुडे सुधारणा १२ लाख ५२ हजार,नाडे सांगवड मंद्रुळ ढेबेवाडी रस्ता प्रजिमा ५८ किमी ३/३०० ते ४/५०० चे रुंदीकरण करणे २४ लाख ४४ हजार, संगमनगर धकका येथे कोयना नदीवर मोठया पुलाचे बांधकाम करणे, १ कोटी ४२ लाख ६० हजार, ढेबेवाडी उमरकांचन जिंती पाचगणी खडीकरण व डांबरीकरण करणे १ कोटी ३५ लाख ६६ हजार, पाटण मणदुरे जळव तारळे पाल रस्ता सुधारणा करणे. १ कोटी १० लाख, नागठाणे तारळे पाटण रस्ता सुधारणा करणे १ कोटी १० लाख, मणेरी गावाजवळ मोठया पुलाचे बांधकाम १ कोटी ०३ लाख ६५ हजार, चिपळूण कराड रस्ता रामा १३६ पूल व मो-यांचे रुंदीकरण करणे व सुधारणा करणे ९२ लाख ७१ हजार, सातारा गजवडी घाणबी केर पाटण रस्ता सुधारणा करणे  ८० लाख, नवजा हेळवाक गोवारे मोरगिरी गारवडे ४४/०० ते ६२/५०० मधील लांबीची सुधारणा करणे ७५ लाख ५३ हजार, पापर्डे ते गारवडे रुंदीकरण करणे  ४५ लाख ३७ हजार, तळमावले गुढे कुठरे काळगाव धामणी आचरेवाडी प्रजिमा ५८  रुंदीकरण व सुधारणा ४१ लाख ३७ हजार, नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर नादुरुस्त पुलाची पुनर्बांधणी करणे ३५ लाख ६३ हजार, नवजा हेळवाक रस्ता रामा १४८ किमी ४३/०० ते ५१/०० चे रुंदीकरण करणे  २४ लाख ५५ हजार, कराड ढेबेवाडी सणबूर महिंद नाटोशी रस्ता किमी ४७/३३० ते ५१/३३० मध्ये संरक्षक भिंत २४ लाख २५ हजार, प्रजिमा ५५ ते मानेवाडी कुंभारगाव गलमेवाडी येवती रस्ता प्रजिमा ५६ किमी ०/०० ते १०/०० चे रुंदीकरण डांबरीकरण करणे ता.पाटण १६ लाख १५ हजार, कुसरुंड महिंद नाटोशी प्रजिमा ५५ रस्त्याची दुरुस्ती करणे १४ लाख ३८ हजार, निसरे फाटा ते विहेघाट ची सुधारणा करणे १२ लाख २१ हजार, चरेगाव चाफळ दाढोली रस्ता प्रजिमा ५५ किमी ७/५०० ते ९/८०० ची सुधारणा करणे व वाहमार्गाचे मजबुतीकरण करणे ता. पाटण जि. सातारा. ८ लाख ७३ हजार, चरेगाव चाफळ दाढोली रस्ता प्रजिमा ५३ ची सुधारणा करणे ता. पाटण जि. सातारा. ८ लाख ७० हजार, गावडेवाडी ते खुडुपलेवाडी ग्रामा ६४ खडीकरण डांबरीकरण करणे ८ लाख, वाखाणवस्ती कराड ढेबेवाडी सणबूर महिंद नाटोशी रस्ता नळकांडी पुलाचे बांधकाम करणे ता. पाटण जि.सातारा ७ लाख ४६ हजार, नाडे सांगवड मंद्गुळ ढेबेवाडी रस्ता प्रजिमा ५८ किमी ०/०० ते २०/७०० रुंदीकरण डांबरीकरण ७ लाख १२ हजार,गुहागर चिपळूण कराड जत विजापूर रस्ता रामा १३६ किमी घाटमाथा ची सुधारणा करणे ६ लाख ३१ हजार, कोयना मार्केट वळण तर्फे ची सुधारणा करणे ६ लाख २९ हजार, हेळवाक ते टोलनाका ची सुधारणा करणे ५ लाख ८८ हजार, नवजा हेळवाक शेणोली स्टेशन रस्ता लहान पूल व मो-यांचे बांधकाम करणे ५ लाख, नवजा हेळवाक शेणोली स्टेशन रस्ता रामा १४८ रुंदीकरण करणे रामा १४८ ते मोरेवाडी मोरगिरी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, कुंभारगाव चिखलेवाडी वरेकरवाडी रस्ता सुधारणा करणे भाग चिखलेवाडी ते वरेकरवाडी ता.पाटण, निसरे ते मारुलधावपट्टीचे ५.५० मीटर ने रुंदीकरण करणे आबदारवाडी रस्ता ग्रामा २६० खडीकरण व डांबरीकरण करणे ,म्हावशी हरीजन वस्ती मोळावडेवस्ती जोडरस्ता खडीकरण व डांबरीकरण, लुगडेवाडी येरफळे ते रामा १३६ रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे,सतिचीवाडी कसणी ते घोटील रस्ता मातीकाम खडीकरण व डांबरीकरण व गोकूळ वर्पेवाडी पोहोच रस्ता सुधारणा करणे तसेच निसरे मारुल मालदन बहुले गुढे काळगाव धनगरवाडी रस्ता सुधारणा करणे या कामांसाठी २१ लाख २४ हजार, रामा ०४ ते कराड ढेबेवाडी महिंद नाटोशी प्रजिमा ५५ बोगदयासह सहापदरीकरणासाठी सर्वेक्षण प्रकल्प अहवाल तयार करणे ८४ लाख ६९ हजार व रामा १३६ डुबलवस्ती ते म्होप्रे रस्ता ग्रामा ८० मजबुतीकरण व डांबरीकरण ८ लाख ८५ हजार असा निधी मंजुर करण्यात आला आहे.
चौकट:- धरणांच्या कामांना २१७ कोटी ५० लाख रुपये निधी मंजुर
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत सहभागी असलेल्या तारळी, वांग मराठवाडी व मोरणा गुरेघर या तीन धरण प्रकल्पाकरीता केंद्र शासनाच्या ए.आय.बी.पी. मधून अनुक्रमे ११४ कोटी ८० लाख, ४० कोटी व ३० कोटी तर प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंर्गत तारळी व मोरणा गुरेघर धरण प्रकल्पाकरीता अनुक्रमे ६ कोटी ६० लाख व १ कोटी १० लाख रुपये आणि शासन अंशदानमधून ब-याच वर्षापासून प्रलंबीत असलेल्या निवकणे लघू पाटबंधारेच्या कामांकरीता २५ कोटी असे एकूण धरणांच्या कामांना २१७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी राज्याच्या अर्थसंकल्पातून मंजुर करण्यात आला असल्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी म्हंटले आहे.


No comments:

Post a Comment