महाराष्ट्र
विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांना महाराष्ट्र विधानसभेचे दुस-यांदा तालिका अध्यक्ष होण्याची
संधी मिळाली असून पीठासन अधिकारी म्हणून निपक्ष:पातीपणे आमदार शंभूराज देसाई हे विधानसभेचे
कामकाज करतात अशा प्रतिक्रिया महाराष्ट्र विधानसभेतील विविध पक्षाच्या सदस्यांनी व्यक्त
केल्या आहेत. तालिका अध्यक्ष पदावरुन आमदार शंभूराज देसाईंच्या बाणेदारपणाचे दर्शन
महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यांना घडले. विधानसभेत भाषण करताना असंसदीय शब्दांना अजिबात
थारा नसतो याचाच प्रत्यय त्यांच्या बाणेदारपणातून आमदार शंभूराज देसाईंनी दाखवून दिला
आहे.
मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय
अधिवेशन सुरु असून यंदाच्या वर्षीच्या अर्थसंकल्प मांडण्याच्या आदल्या दिवशी सभागृहातील
चर्चेमध्ये राट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे जाणिवपुर्वक संभाजी
भिडे यांचे विधान उद्धृत करण्याच्या नावाखाली एका अपशब्दाचा वारंवार उच्चार करीत होते.
त्यांच्या या वारंवारच्या उच्चारामुळे सभागृहाती सर्व सदस्य अवाक झाले. तालिका अध्यक्षपदी
बसलेले आमदार शंभूराज देसाई हे तर या सातत्याच्या उच्चारामुळे संतप्त झाले आणि त्यांनी
तालिका अध्यक्ष म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड यांना चांगलेच खडसावले व आमदार जितेंद्र
आव्हाड यांना समज देत सातत्याने संभाजी भिडे यांचे विधान उद्धृत करीत आहात हे चुकीचे
आहे आपणांला सभागृहात बोलताना कोणताही असंसदीय शब्द वापरता येणार नाही. सभागृहाची पंरपरा
ओळखून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाषण करावे असे त्यांना सुचित केले व आमदार जितेंद्र
आव्हाड यांनी उच्चारलेले ते शब्द रेकॉर्डवरुन काढण्याच्या आमदार शंभूराज देसाईंनी अधिका-यांना
सुचना केल्या. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनीही आव्हाडांना चांगलेच
सुनावत रेकॉर्डवर लिहता येतील असेच शब्द भाषणात वापरा असे सांगितले. विषय कोणताही असो
तो कशाप्रकारे हाताळायचा आणि सभागृह नीट चालविणे हीच खरी कसोटी तालिका अध्यक्षांची
असते. आमदार शंभूराज देसाई ही कसोटी एक आव्हान म्हणून स्विकारत असल्याचे यावरुन दिसून
आले. त्यांना संसदीय प्रणालीचा गाढा अभ्यास असल्याकारणांने तालिका अध्यक्ष पदावर असो
किंवा शिवसेना पक्षाचे प्रतोद म्हणून सभागृहात भाषण करते वेळी आमदार शंभूराज देसाई
यांचेकडून नेहमीच संसदीय कार्यप्रणालीचा आणि संसदीय शब्दांचा सन्मान राखण्याचे काम
ते करतात. त्यांची भाषणे सभागृहात एैकण्यासारखी असतात अश्या अनेक प्रतिक्रिया विधानसभा
सभागृहातील अनेक सदस्यांनी अनेकदा दिल्या आहेत.म्हणूनच आमदार शंभूराज देसाईंना संपुर्ण
महाराष्ट्र उत्कृष्ट संसदपटु म्हणून ओळखतेा.तालिका अध्यक्ष म्हणून निपक्ष:पातीपणे सभागृह
चालविण्याची कसोशी त्यांना चांगलीच गवसली असून जेव्हा जेव्हा ते तालिका अध्यक्ष म्हणून
अध्यक्षांच्या चेअरवर असतात तेव्हा सभागृहात चांगल्याला चांगले आणि वाईटाचा वाईट म्हणण्याचे
धारिष्टही ते दाखवितात.हाच खरा बाणेदारपणा त्यांच्यामध्ये दिसून येत असल्याने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ना.हरीभाऊ बागडे
यांनी त्यांना अनेकदा विधानसभेतील कामकाज सुरुळीत चालविलेबद्दल शाबासकीची थापही दिली
आहे.
No comments:
Post a Comment