महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण व येथील निसर्गसौंदर्य लाभलेल्या कोयनानगर ता.पाटण येथील व कोयनानगरच्या १० किलोमीटर परिसरातील प्रमुख पर्यटन ठिकाणांचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करणेकरीता पर्यटन विकास आराखडा तयार करुन आराखडयातील कामांना आवश्यक असणारा निधी पर्यटन विभागाकडून उपलब्ध करुन द्यावा. अशी मागणी पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांचेकडे केली होती.तसेच तालिका अध्यक्ष म्हणूनही पर्यटनमंत्री यांना अध्यक्ष खुर्चीवरुन सुचित करण्यात आले होते. आमदार शंभूराज देसाईंच्या मागणीवरुन पर्यटनमंत्री ना.रावल यांनी कोयना पर्यटन विकास आराखडा तात्काळ तयार करुन शासनाला सादर करावा अशा लेखी सुचना जिल्हाधिकारी,सातारा यांना दिल्या आहेत.
आमदार शंभूराज देसाई यांनी राज्याचे पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांचेकडे कोयना पर्यटन विकास आराखडयात खालील बाबींचा समावेश असावा अशी लेखी मागणी केली आहे या मागणीवर पर्यटन मंत्री यांनी मागणीप्रमाणे कोयना पर्यटन विकास आराखडा तात्काळ तयार करुन शासनाला सादर करावा असे म्हंटले आहे. आमदार शंभूराज देसाईंनी केलेल्या मागणीमध्ये राज्य शासनाच्यावतीने सन २०१७-१८ हे आर्थिक वर्ष पर्यटन वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेनंतर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण व येथील निसर्ग सौंदर्य लाभलेल्या कोयनानगर,ता. पाटण जि. सातारा या परिसराला प्रादेशिक पर्यटन स्थळांचा दर्जा देवून कोयना पर्यटनाचा सविस्तर आराखडा तयार करुन या आराखडयास महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांतर्गत आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दिल्यास महाराष्ट्राला प्रकाशमान करणारे कोयना धरण व या धरणाच्या आसपासच्या १० किमीचापरिसर हा पर्यटन स्थळे म्हणून अल्पावधीत नावारुपास येईल. महाराष्ट्राला प्रकाशमान करणारे कोयनाधरण व या धरणाच्या आसपासच्या १० किमीच्या परिसरातील विविध ठिकाणे हि पर्यटनांच्यादृष्टीने विकसीत करणेकरीता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांतर्गत या ठिकाणांचा सर्व्हे करुन याचा आराखडा तयार करणे अत्यंत गरजेचे आहे. असे म्हंटले आहे. कोयना पर्यटन आराखडयामध्ये समाविष्ठ करावयाची ठिकाणे व पर्यटनाच्यादृष्टीने विकसित करावयाची बाबींचा त्यांनी पुढीलप्रमाणे समावेश केला आहे. यामध्ये कोयनानगर येथील अस्तित्वात असणा-या नेहरु उद्यानाचे सुशोभिकरण व नुतनीकरण करणे, धरण परिसराकडे जाणा-या रस्त्यांवर जुन्या झालेल्या कारंजांचे सुशोभिकरण व नुतनीकरण करणे,कोयना धरण परिसराकडे जाणा-या रस्त्यावरील धरणाच्या मेनगेटच्या चौकामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा बसविणे, कोयना धरण व्यवस्थापनाचे जीर्ण झालेल्या विश्रामगृहांचे नुतनीकरण करणे,कोयना धरणाकडे जाणा-या रस्त्यावर स्ट्रीट लाईट व विद्यतीकरण विकास करणे, कोयनानगर येथे पर्यटकांना बसणेकरीता ठिकठिकाणी बसण्याची व्यवस्था करणे,पर्यटकांना रमणीय ठिकाण म्हणून लहान मुलांच्याकरीता वॉटर पार्कची उभारणी करणे,ओझर्डे येथील निसर्गरम्य ओझडे तीन धारी धबधबा परिसर सुशोभिकरण व नुतनीकरण,मानाईनगर येथे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये पर्यटकांना बोटींग करणेकरीता बोटींग स्पॉट जलाशयाशेजारी विकसित करणे,हुंबरळी महादेववाडी येथे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये पर्यटकांना बोटींग करणेकरीता बोटींग स्पॉट जलाशयाशेजारी विकसित करणे,कोयनानगर ते हुंबरळी रस्त्यावर कोयना शिवसागर जलाशयाचे टेकडीवरुन निसर्गरम्य दर्शन होणेकरीता टेकडीच्या ठिकाणी पर्यटक स्पॉट उभारणे,नवजा या ठिकाणी जंगली जयगड किल्लावरुन कोकण परिसराचे दर्शन होणेकरीता गडाचे ठिकाणी पर्यटक स्पॉट उभारणे,घाटमाथा हे कोकण आणि कोयना विभागाचे कराड चिपळूण महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असून घाटमाथा या ठिेकाणी संपुर्ण कोकण दर्शन घडते या ठिकाणी पर्यटक स्पॉट उभारणे, प्रचितीगड पर्यटकांना पर्यटनाच्यादृष्टीने विकसित करणे व या गडावरुन कोकण परिसराचे दर्शन होणेकरीता गडाचे ठिकाणी पर्यटक स्पॉट उभारणे, भैरवगड पर्यटकांना पर्यटनाच्यादृष्टीने विकसित करणे व या गडावरुन कोकण परिसराचे दर्शन होणेकरीता गडाचे ठिकाणी पर्यटक स्पॉट उभारणे या बाबींचा समावेश असून या बांबीचा सविस्तर आराखडा तयार करण्याच्या सुचना करण्यात आल्या असल्याचे आमदार शंभूराज देसाई यांचे लेखी पत्रावर म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment