Wednesday 14 March 2018


विकासाला चालना देणारे आमदार शंभूराज देसाई यांच्या पाठीशी ठाम रहा- यशराज देसाई
 ­
       आमदार शंभूराज देसाई पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व करीत आहेत राज्यात युतीचे असणारे शासन या शासनाच्या माध्यमातून कोटयावधी रुपयांचा निधी पाटण मतदारसंघातील विविध विकासकामांना ते आणत आहेत. आज त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात गत अनेक वर्षापासून प्रलंबीत राहिलेली विविध विकासकामे मार्गी लागत आहेत. मागेल त्या गांवाला विकासकाम मिळवून देण्यासाठी त्यांची सातत्याने धडपड सुरु असते.विकासाला चालना देणारे नेतृत्व आमदार शंभूराज देसाई यांच्या रुपाने आपणां सर्वांना मिळाले आहे त्यांच्या पाठीशी मतदारसंघातील जनतेने ठाम उभे रहावे असे आवाहन युवा नेते यशराज देसाई यांनी केले.
निवडे पुर्नवसित गावठाण ता. पाटण येथील अंतर्गत रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,शिवदौलत बॅकेचे चेअरमन अॅ़ड.मिलिंद पाटील,लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे माजी संचालक बबनराव शिंदे,संचालक सोमनाथ खामकर,गजानन जाधव, शिवदौलत संचालक अभिजीत पाटील, विजय पवार,माणिक पवार, तारळे सरपंच सौ.खांडके, उपसरपंच राजू नलवडे यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना युवा नेते यशराज देसाई म्हणाले की, पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी पाटण तालुक्याचा सर्वागीण विकास साधला. त्यांच्या पश्चात अनेक वर्षे मतदारसंघातील विविध विकासकामे प्रलंबीत राहिली. २००४ साली शंभूराज देसाई हे पहिल्यांदा आमदार झाले. त्यावेळी आघाडीचे सरकार सत्तेत होते. विरोधी बाकावर बसून सुध्दा आमदार शंभूराज देसाई यांनी त्या पाच वर्षात पाटण मतदारसंघात २१७ कोटी रुपयांची विकासकामे शासनाकडून मंजुर करुन आणली. आपल्या मतदारसंघातील प्रलंबीत प्रश्नांच्या संदर्भात विधानसभेत आवाज उठवून शासनाचे लक्ष वेधून त्यांनी मतदारसंघातील जनतेच्या हिताच्या दृष्टीने अनेक धोरणात्मक असे निर्णय करुन घेतले. सर्वसामान्य जनतेला आपलेसे वाटणारे नेतृत्व म्हणून मतदारसंघातील जनता आमदार शंभूराज देसाई यांचेकडे पहात असून त्यांनीही सर्वसामान्य जनतेला आपला केंद्रबिंदू मानून मतदारसंघातील विविध विकासकामे मार्गी लावण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. मिळालेल्या सत्तेचा वापर त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी केला आहे. डोंगराएवढे काम त्या पाच वर्षाच्या काळात करुन देखील केवळ ५८० मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता त्याची सल नेहमीच आपल्या सर्वांच्या मनात सलत राहील. २००९ चा पराभव जिव्हारी लागल्यानंतर ज्याप्रमाणे आपण सर्वजण २०१४ च्या निवडणूकीची तयारी केलीत आणि १८८२४ एवढया मोठया मताधिक्कयाने आपण सर्वांनी त्यांना आमदार केलेत. याचे सर्व श्रेय मतदारसंघातील जनतेचे आहे. २०१४ च्या विधानसभेच्या निवडणूकीत जनतेला दिलेल्या जाहिरनाम्यातील वचननाम्याची पुर्तता  करण्यावर त्यांनी गत तीन वर्षात भर दिला आहे. विकासापासून वंचित राहिलेल्या गावांचा अनुशेष भरुन काढणेसाठी आमदार शंभूराज देसाई ही आपली राजकीय ताकत शासनदरबारी वापरत आहेत आणि मतदार संघातील जनतेच्या समस्या त्यांना आवश्यक असणा-या मुलभूत सुविधा यां कामांना शासनाच्या तिजोरीतून आवश्यक असणारा निधी ते मतदारसंघात आणत आहेत. गत तीन वर्षात सुमारे ३०० हुन अधिक कोटींची कामे आमदार शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघात मंजुर करुन आणली आहेत यातील अनेक कामे आज मोठया प्रमाणात मार्गी लागल्याचे आपण पहात आहोत.आमदार शंभूराज देसाई यांचे विशेष प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघात राज्य शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती व जिल्हा नियोजन समितीच्या विशेष घटक योजना अशा विविध योजनेअंतर्गत त्यांनी शासनाकडून मंजूर करुन घेतलेल्या सातारा जिल्हयात सर्वात जास्त आणि एकाचवेळी एकूण ५३ नळ पाणी पुरवठा योजनांची भूमिपुजने आमदार शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात होत आहेत ही किती मोठी बाब आहे याचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. जनतेचा विकास कसा साधायचा त्याकरीता कोणत्या उपाययोजना राबवायच्या याची इत्ंभूत माहिती असणारे आपले सर्वांचे लाडके आमदार शंभूराज देसाई हे कर्तव्यनिष्ट लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांना लाभले आहेत त्यांचे हात बळकट करणे आपल्या सर्वांचे काम असून ते काम आपण सर्वांनी करुया असे आवाहन त्यांनी शेवठी बोलताना केले. उपस्थितांचे स्वागत बबनराव शिंदे यांनी करुन उपस्थिंतांचे आभार मानले.



No comments:

Post a Comment