Saturday 3 March 2018

आमदार देसाई यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहवे


 पाटण तालुक्याचे लोकप्रिय आमदार शंभूराज देसाई यांनी आपल्या सत्तेच्या केवळ तीन वर्षात पाटण मतदार संघात शेकडो कोटींची विकासकामे खेचून आणून ती मार्गी ही लावली आगामी दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पाटण विधानसभा मतदार संघात अजून ही शेकडो कोटींची विकासकामे आमदार साहेब प्रयत्नशील आहेत.त्यामुळे आज पर्यंत ज्याप्रमाणे आमदार देसाई यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात तसेच आगामी विधानसभेसाठी ही आमदार देसाई यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा आणि आपल्या पाटण मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन आमदार शंभूराज देसाई यांचे पुत्र यशराज देसाई यांनी केले.
       ते मस्करवाडी(धामणी)शेडगेवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण  डांबरीकरण रस्ता भूमीपुन  करताना बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,शिवदौलत बँकेचे अध्यक्ष मिलिंद पाटील,डॉ दिलीपराव चव्हाण,पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई,पंचायत समिती सदस्य सिमा मोरे,कारखान्याचे संचालक बबनराव भिसे,विजयराव जंबुरे,बबन मस्कर,आत्माराम मस्कर,सखाराम मस्कर,प्रकाश पानसे,प्रवीण  दुधडे,मारुती  मोहन शेडगे, मस्कर,तुकाराम मस्कर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
      ते म्हणाले एक सत्ताधारी पक्षाचा आमदार कसा विकास करतो हे केवळ पाटण मतदार संघानेच नव्हे संपूर्ण जिल्हा अनुभवत आहे.आपल्या केवळ तीन वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीत आमदार देसाई यांनी तालुक्यातील प्रत्येक गांवात वाडी_वस्तीवर रस्ता, पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी ,वीज, बारमाही रस्ते, पुल आदी कोट्यावधी रुपयांची विकासकामे करून तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा आपण प्रयत्न केला त्यामुळे आजही तालुक्याच्या कानाकोपऱ्यात,वाडी वस्तीवर सर्वत्र विकासकामे सुरु असल्याचे दिसत आहे.मतदार संघातील जनतेला आपला लोकप्रतिनिधी विधानसभेत पाठवल्याचा सार्थ अभिमान प्रत्येक मतदाराच्या चेहऱ्यावर दिसून येत असून याचा जनतेला ही सार्थ अभिमान वाटत आहे.आमदार देसाई यांच्या आमदारकीला अद्याप ही दोन वर्षे बाकी आहेत.पाटण मतदारसंघातील 70 टक्के विकासकामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून आगामी काळात उरलेली 30 टक्के कामे आमदार देसाई पूर्णत्वास नेतील याबाबत विश्वास असून  सत्ताधारी आमदारकीच्या माध्यमातून आमदार देसाई  पाटण विधानसभा मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी कटिबद्ध आहेत मात्र कार्यकर्त्यांनी तीन वर्षात केलेली विकासकामे जनते पर्यंत पोहचवावीत असे आवाहन ही  यशराज देसाई यांनी केले.
      कार्यक्रमाचे स्वागत सरपंच बबन मस्कर यांनी केले तर प्रास्ताविक आबाजी कदम यांनी केले.


No comments:

Post a Comment